टवेंटी-२० विश्‍वकरंडक इंग्लंडने जिंकला

17 May

बार्बाडोस –  बार्बाडोसच्या किंग्स्टन ओव्हलची खेळपट्टी उत्तरार्धात फलंदाजीस अनुकूल होत जाईल, असे इंग्लंडचे गणित होते. तसेच ती साखळी सामन्याइतकी वेगवान नसेल, असाही त्यांचा कयास होता व तोच खरा ठरला. सामन्याच्या सुरवातीस वेगवान गोलंदाजीस साथ देणाऱ्या खेळपट्टीचा फायदा घेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्‌स आणि 18 चेंडू राखून सहज पाडाव केला आणि विश्‍वकरंडक टी- 20 क्रिकेट स्पर्धेतील विजेतेपदास गवसणी घातली. इंग्लंडने प्रथमच क्रिकेटमधील विश्‍वकरंडक जिंकला.

या स्पर्धेत उत्तम सांघिक कामगिरी केलेल्या इंग्लंडने “सुपर एट’पासून कामगिरी उंचावत नेली आणि यंदाच्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत अपराजित राहिलेल्या ऑस्ट्रेलियास जवळपास एकतर्फी ठरलेल्या सामन्यात पराजित करताना मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावला. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या अंतिम टप्प्यात त्यांची पकड काहीशी निसटली, पण त्यांनी लक्ष्य धावसंख्या आवाक्‍यात ठेवली. ऑस्ट्रेलियाने खराब सुरवातीनंतर दीडशेची मजल मारली. डेव्हिड हसीने दमदार अर्धशतकी खेळी करीत ऑस्ट्रेलियास प्रतिकूल परिस्थितीतून सावरले. क्रेग किएसवेट्टर आणि केविन पीटरसनने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. दोघांनी सुरवातीपासून आक्रमक फटकेबाजी करीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर दडपण वाढवत नेले. या स्पर्धेत सर्वांत ताकदवान समजली जात असलेली ऑस्ट्रेलियन गोलंदाजी कोलमडली. क्रेग व केविनने अर्धशतकी भागीदारी 39 चेंडूंत आणि शतकी भागीदारी 65 चेंडूंत करीत सामन्याचा निर्णयच लावला. ऑस्ट्रेलियाने शतकासाठी 16.3 षटके घेतली, तर इंग्लंडने 11.4 षटके. हाच फरक अखेर निर्णायक ठरला.

त्यापूर्वी, निराशाजनक सुरवातीनंतर पुन्हा एकदा हसी ऑस्ट्रेलियाच्या मदतीला धावून आला. फरक इतकाच होता की या वेळी माईक ऐवजी डेव्हिड हसी सुरेख खेळी खेळला. शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर या आक्रमक फलंदाजांवर ऑस्ट्रेलियाची खरी मदार होती. मात्र, या दोघांप्रमाणेच आक्रमक फलंदाजी करणारा ब्रॅड हॅडिनही बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव अडचणीत आला होता. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा इंग्लंडचा निर्णय त्यामुळे चांगलाच फायदाचा ठरला. साईडबॉटमची वेगवान आणि ग्रॅमी स्वानच्या फिरकीतील अचूकतेला इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांनी सुरेख साथ केल्याने ऑस्ट्रेलियाच्या डावाला एकवेळ खीळ बसली होती.

रायन साईडबॉटमच्या अचूकतेसमोर वॉटसन (2) आणि हॅडिन (1) बाद झाले. लंबच्या थेट फेकीमुळे वॉर्नर (2) धावबाद झाला. त्यामुळे तिसऱ्या षटकातच ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 8 अशी झाली होती. त्या वेळी खेळपट्टीवर उतरलेल्या डेव्हिड हसीने खेळाची सूत्रे हाती घेत ऑस्ट्रेलियाचा धावफलक हलता ठेवला.

प्रथम कर्णधार मायकेल क्‍लार्क आणि नंतर कॅमेरॉन व्हाइट, माईक हसी यांच्या साथीत उपयुक्त भागीदारी करत त्याने ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. क्‍लार्कच्या साथीत 37 धावा जोडल्यावर व्हाईटच्या साथीत त्याने 6 षटकांत 50 धावा जोडल्या. अखेरच्या चार षटकांत त्याने माईकच्या साथीत 47 धावांची भर घातली.

अखेरच्या षटकांत हेव्हिड हसी फटकेबाजी करणार हे समजून सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक ठेवण्याचे इंग्लंड कर्णधार पॉल कॉलिंगवूडचे धोरण चांगलेच यशस्वी ठरले. त्यामुळे धाव घेण्याच्या नादात डेव्हिड हसी धावबाद झाला. त्याने 54 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 59 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 20 षटकांत
6 बाद 147
डेव्हिड हसी 59
54 चेंडू, 2 चौकार, 2 षटकार
कॅमेरान व्हाइट 30
19 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार
मायकेल क्‍लार्क 27
माईक हसी नाबाद 17
रायन साईडबॉटम 4-0-26-2
ग्रॅमी स्वान 4-0-17-1
ल्यूक राईट 1-0-5-1
इंग्लंड 20 षटकांत
3 बाद 148
क्रेग किएसवेट्टर 63
49 चेंडू, 7 चौकार, 2 षटकार
केविन पीटरसन 47
31 चेंडू 4 चौकार, 1 षटकार
कॉलिंगवूड नाबाद 12
इयॉन मॉर्गन नाबाद 15
शॉन टैट 4-0-27-1
स्टीव्हन स्मिथ 3-0-21-1
मिशेल जॉन्सन 4-0-27-1

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: